चीन च्या पुन्हा कागाळ्या डोकलाम मध्ये चीन चे हजारो सैनिक | Lokmat News

2021-09-13 0

जवळपास 73 दिवसांच्या तणावानंतर डोकलाममधून चीन आणि भारताने आपापले सैन्य मागे घेतले. हा एक प्रकारे भारताचा विजयच म्हणावा लागेल. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे हा संघर्ष झाला होता. या सर्व घडामोडीनंतरही चीनच्या डोकलाममधील हालचाली कमी झालेल्या नाहीत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डोकलाम जवळील भागात चीनचे जवळपास 1600 ते 1800 सैनिक तळ ठोकून आहेत.  सेना दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार डोकलाम भागात चीनने दोन हेलीपॅड, शेल्टर्स, तयार केबीन, सामुग्री ठेवण्यासाठी स्टोअर रुम बांधले आहेत. यावरुन या कडाक्याच्या थंडीत एवढ्या उंचावर चीनी सैनिकांचा जास्त काळ वास्तव करण्याचा मनसुबा दिसत आहे. भारतीय सैनिक सामरिक दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे चीन कायमच डोकलाममध्ये अनधिकृतरित्या घुसण्याचा प्रयत्नात असतो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires